![]() |
Tar Kumpan Youjana |
नमस्कार शेतकरी
मित्रानो ,अपना सर्वांना माहित आहे .भारत हा कृषी प्रधान देश त्या मुळे येथील लोक
प्रामुख्याने शेती हा व्यवसाय करतात .त्यामुळे शासन देखील शेतकऱ्यांसाठी अनेक
योजना राबवते .आजकाल शासन खूप वेगवान झाले आहे .नवनवीन योजना शेतीसाठी आणत आहे .आज आपण अश्याच योजनेविषयी माहिती
पाहणार आहोत .ती म्हणजे ‘तार कुंपण योजंना ‘हि योजना प्रामुख्याने महाराष्ट्र
राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून राबवली जाणार आहे .या योजनेमार्फत शेतकऱ्यांना
शेतीला तार कुंपण करण्यासाठी ९०%अनुदान मिळते .शेतकऱ्यांना या योजनेमार्फत
मिळणाऱ्या खर्चा व्यतिरिक्त केवळ १० % खर्च करावा लागणारा आहे.
हि योजना महाराष्ट्र
राज्य सरकारने २०२१ -२०२२ मध्ये सुरु केली होती या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासामिळणार आहे .या योजनेमुळे प्रामुख्याने डोंगराळ भागातील शेतकऱ्यांना भटक्या जनावरे
जसे हरीण ,जंगली डुक्कर ,रान रेडा , यांच्यापासून शेती चे संरक्षण करता येईल .या
योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे .पिक खराब न
झाल्यामुळे शेत मालाला योग्य भाव मिळेल .या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या
प्रमाणावर दिलासा मिळणार आहे .
तार कुंपण योजनेचा उद्देश काय आहे ?;
१ .शेतकऱ्यांच्या धान्याची सुरक्षिततेसाठी हि
योजना महाराष्ट्र सरकारने राबवली आहे .
२ .या
योजनेंतर्गत शेतीसाठी तार कुंपणाच्या माध्येमातून चांगले धान्य ग्राहकापर्यंत
उपलब्ध करून देने .
३ . या
योजनेमुळे प्रामुख्याने डोंगराळ भागातील शेतकऱ्यांना भटक्या जनावरे जसे हरीण
,जंगली डुक्कर ,रान रेडा यांच्यापासून शेती
चे संरक्षण करता येईल .
तार कुंपण योजनेची पात्रता काय आहे ? ;
१ .शेतकरी महाराष्ट्र राज्याचा निवासी असावा .
२ .शेतकऱ्यांने १८ वर्षे पूर्ण केलेले असावे .
३ .किमान शेतकरी १.२५ एक्कर जमिनीचा मालक
असावा .
४ .शेतकऱ्यांची जमीन १० वर्षापासून शेतकऱ्यांच्या ताब्यात असणे गरजेचे आहे
तार कुंपण योजनेच्या आटी काय आहेत ?
१ . निवडलेले क्षेत्र वन्य प्राण्यांच्या नैसगिक रस्त्यात नसावे .
२. सदर जमिनीचा प्रकार पुढील दहा वर्ष बदलता येणार नाही
आपल्या शेतीचे नुकसान
वन्य प्राण्यांपासून होत आहे .असे ग्राम परिस्थिती विकास समिती व सयुक्त वन व्यव
स्थापन समिती कडून कडून ठराव घेऊन जोडावा .
तार
कुंपण योजनेतून दोन कुन्तल काटेरी तार सोबत ३० खांब ९०%अनुदानावर शेतकऱ्यांना पुरवण्यात
येणार आहेत.
तार कुंपण योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात ? ;
१
.शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे .
२
.शेतकऱ्यांचे बँक खाते असणे गरजेचे आहे .
३
.बँक खात्याला आधार लिंक असणे गरजेचे आहे .
४
.शेतकऱ्यांची जमीन जंगली भागात येत असल्याच वन परीक्षक समिती कडून प्रमाणपत्र
घ्यावे .
५
.ग्रामपंच्यायत रहिवासी असल्याचा दाखला .
तार कुंपण योजनेचा अर्ज कसा प्राप्त करायचा? ;
अर्ज हा प्रामुख्याने offline असल्यामुळे पंचायत समिती
मधून घ्यावयाचा आहे .आणि भरावयाचा आहे आणि पंचायत समिती मध्ये दाखल करावयाचा आहे .