राज्यातील जिल्हा परिषदेतील ग्रामविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या 19 हजार पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या गट क व ग्रामविकास विभाग अंतर्गत येणाऱ्या पदांची भरती करण्यात येणार आहे.यासाठी आयबीपीएस या कंपनीची नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे.पद भरती ला सर्वोच्च प्राथमिकता द्यावी अशा सूचना ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांनी दिलेल्या आहेत.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला दिलेल्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी 75000 सरकारी कर्मचारी भरण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार सरकारने केला आहे. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत ही 75 हजार कर्मचारी पदभरती पूर्ण केली जाणार आहे या अगोदर पदभरती बाबत सरकारने एक मोठा निर्णय देखील घेतलेला होता.येणाऱ्या जाहिराती करिता उमेदवारांना दोन वर्षे वयोमर्यादा देखील वाढवून देण्यात आली होती पद भरती करण्या अगोदर बिंदू नियमावली देखील निश्चित करण्यात आली आहे.याबाबत आयबीपीएस कंपनीशी करार देखील करण्यात आलेला आहे त्यामुळे बहुदा होणारी ही परीक्षा ऑनलाइन होणार आहे या अगोदर चार वर्ष ही पदभरती झालेली नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष आहे .त्यामुळे राज्य सरकार अंतर्गत होणारी पदभरती ही पारदर्शक रित्या व्हावी अशी विद्यार्थ्यांची इच्छा आहे त्यामुळे पारदर्शक पदभरती व्हावी अशा देखील सूचना देण्यात आलेले आहेत. लांबणीवर पडणारी पदभरती वाढणारे वय यामुळे विद्यार्थी वर्गात मात्र मोठी नाराजी आहे .ही नाराजी दूर करण्यासाठी सरकारला लवकरात लवकर पदभरती करणे आवश्यक आहे. यामुळे जिल्हा परिषद पदभरतीला मुहूर्त कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणावर लक्ष आहे.
