महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागात 13000 पदे रिक्त

 महाराष्ट्राच्या महसूल विभागामध्ये जवळपास साडेतेरा हजार पदे रिक्त आहेत . यामुळे सर्वसामान्य शेतकरी वर्ग विद्यार्थी वर्ग यांची कामे अडखळली आहेत. राज्यातील महसूल विभागातील रिक्त पदामुळे सर्वसामान्यांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे राज्याच्या महसूल विभागामध्ये जिल्हाधिकारी पदापासून ते शिपाई पदापर्यंत बरीच पदे शिल्लक आहेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थी वर्गाला तसेच शेतकऱ्यांना महसूल विभागातून काढावयाच्या कागदपत्राबाबत अडचणी निर्माण होत आहेत .या अगोदर राज्याच्या तलाठी भरतीचा प्रश्न पुढे आला होता. राज्यात तलाठ्यांची जवळपास साडेचार हजार पदे रिक्त आहेत कर्मचाऱ्यांची कमतरता महसूल विभागात असल्यामुळे एकाच कर्मचाऱ्यांवर आणि कामाचा बोजा पडतो यामुळे सर्वसामान्यांची कामे मात्र व्हायची शिल्लक राहतात. नैसर्गिक आपत्ती महसूल विभागातील कामे पंचनामे यामध्येच सरकारी व्यवस्था हल्ली अडकलेली दिसते. त्यामुळे महसूल विभागातील इतर कामासाठी कर्मचाऱ्यांना वेळ उपलब्ध होत नाही त्यामुळे प्रलंबित कामांचा बोजा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे व सर्वसामान्य शेतकरी व विद्यार्थी वर्गाचा कागदपत्रे काढतेवेळी भ्रमनिराश होतो त्यांना वारंवार सरकारी कार्यालयाला फेरफटका मारावा लागतो. यामुळे जाणारा वेळ व खर्च होणारा पैसा यामुळे शेतकरी हवालदिल होतो. 



राज्याच्याराज्याच्या महसूल विभागातील तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. या अगोदर शासनाने वारंवार तलाठी भरतीचे आश्वासन मात्र दिले आता विद्यार्थी वर्ग तलाठी भरतीकडे आस लावून बसला आहे तरी आता पाहणे महत्त्वाचे आहे की शासन महसूल विभागातील रिक्त पदे केव्हा भरते. 

 महसूल विभागात अप्पर जिल्हाधिकारी ,जिल्हाधिकारी ,तलाठी तहसीलदार ,नायब तहसीलदार, अधीक्षक ,उपाधीक्षक भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, मंडलाधिकारी ,वरिष्ठ लिपिक ,महसूल सहाय्यक, कनिष्ठ लिपिक ,शिपाई .इत्यादी पदे रिक्त आहेत. शासनाकडून वारंवार आश्वासनेच दिली जातात असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. 

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा शासनाशी संबंधित वेबसाईट नाही. कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून मानू नका आणि कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संबंधित तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाहीत.आम्ही आमच्या सर्व अभ्या गताना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post