केंद्रीय निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दणका


      केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिलेला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे.राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाबाबत निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसला नोटीस देखील पाठवली होती.त्यावर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी आयोगासमोर बाजू देखील मांडली होती. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय दर्जा कायम राहणार असल्याचा आशावाद व्यक्त केला.मात्र निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला पक्षाच्या मतांची टक्केवारी व निवडून आलेल्या जागांच्या संख्येवर पक्षाचा राष्ट्रीयत्वाचा दर्जा ठरवला जातो. 


 राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाची निकष

 १. किमान चार राज्यामध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत सहा टक्के मत मिळणे आवश्यक आहे. किमान चार सभासद लोकसभेमध्ये निवडून येणे आवश्यक आहे

 २. तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण जागांपैकी दोन टक्के जागा निवडून येणे आवश्यक आहे

 ३. किमान चार राज्यात राज्य पक्ष म्हणून मान्यता असावी

 राष्ट्रीय पक्षाचा दर्जाचा लाभ

  १. राखीव नोंदणी चिन्ह. 

   २. पक्षाच्या कार्यालयासाठी अनुदान दरात जमीन उपलब्ध होती. 

    ३. दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवर मुक्त प्रक्षेपण होते. 

    ४. ‍ निवडणूक आयोगाकडून निवडणूक याद्यांचं मोफत वितरण देखील होतं. 


Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा शासनाशी संबंधित वेबसाईट नाही. कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून मानू नका आणि कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संबंधित तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाहीत.आम्ही आमच्या सर्व अभ्या गताना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post