भारतीय राजकारणातील चाणक्य
भारतीय राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांविषयी आपण काही माहिती पाहणार आहोत. शरद गोविंदराव पवार बारामती येथील एक लोकप्रिय नेते ज्यांनी 50 वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात काम केलं काही नेत्यांच्या वयांपेक्षाही जास्त राजकीय अनुभव शरद पवार यांना आहे. महाराष्ट्रातील राजकारणाबरोबरच भारतीय राजकारणामध्ये देखील त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे आपल्या कारकिर्दीत शरद पवार यांनी तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे.
तसेच भारत सरकारमध्ये संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री पद सुद्धा ग्रहण केले शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. बारामती खरेदी विक्री संघामध्ये दीर्घकाळ कार्यरत देखील होते बारामती मधूनच त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले उच्च शिक्षण घेण्यासाठी ते पुण्याला गेले तेथेच ती विद्यार्थी राजकारणामध्ये सक्रिय झाले. गोवा मुक्ती संग्रामासाठी रॅली देखील त्यांनी काढली होती.कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणून सुद्धा ती कार्यरत होते विद्यार्थी दशेत असतानाच त्यांनी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण खूप प्रभावित झाले त्यांनी शरद पवारांना युवक काँग्रेसमध्ये सामील होण्याचा सल्ला दिला. राजकारणाचे धडे त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्याकडून घेतले. अवघ्या 27 व्या वर्षी 1967 मध्ये त्यांनी आमदारकीची निवडणूक जिंकली.
त्यांनी सांगितलेत्यांनी सर्वात कमी वयामध्ये आमदार होण्याचा मान देखील मिळवला.वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात अवघ्या 29 व्या वर्षी राज्यमंत्री म्हणून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला 1978 च्या निवडणुकीत वसंत दादा पाटील मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले त्याकाळी पवारांनी 12 आमदार फोडून विरोधी पक्षाची हात मिळवणी करून सरकार स्थापन केले .1978 मध्ये शरद पवार यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री ते ठरले त्यानंतर 1988 ते 1991 व 1993 ते 1995 या कालखंडात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
10 जून 1999 यांनी त्यांच्या नव्या पक्षाची स्थापना केली तो नवीन पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेनंतर पहिल्याच निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आले. राजकारणाबरोबरच शरद पवार यांचा क्रिकेटशी देखील संबंध येतो 2005 मध्ये ते बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवडून आले 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली आयसीसीआयचे अध्यक्ष पद भूषवणारे ते दुसरे भारतीय व्यक्ती होते. 2014 मध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी बाकावर बसावे लागले .शरद पवार यांनी 2014 पासून तरुणांना राजकारणामध्ये स्थान मिळावे याकरिता लोकसभेची निवडणूक लढविली नाही.
2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागा मिळाल्या भाजपा शिवसेनेचे सरकार देखील आले राष्ट्रवादी पक्ष यापुढे कमी प्रभावी ठरेल .असे वाटत असतानाच 2019 च्या निवडणुकीमध्ये पक्षाला 54 जागा मिळाल्या आणि शरद पवार यांचा प्रभाव पुन्हा दिसून आला शरद पवारांबाबत एक महत्त्वाचे वाक्य जे त्यांनी विरोधकांना उत्तर देण्यासाठी वापरली" कुस्ती पैलवान अशी केली जाते वस्तादशी नाही" वयानुसार शरद पवार राजकारणापासून दूर जातात की काय असे वाटत असताना त्यांची सातारा येथील भर पावसातील सभा बरच काही सांगून जाते .बऱ्याच वेळा शरद पवार देखील असे म्हणतात मी आणखी म्हातारा झालेलो नाही आणखी बऱ्याच जणांना घरी बसवायचा आहे.महाराष्ट्रातील राजकारण हे बऱ्याच प्रमाणावर शरद पवार यांच्या भोवती फिरते.
