गाथा महामानवांची:: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची

 


14 एप्रिल   1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदोर जवळील महू येथे लष्करी छावणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी सपकाळ असे होते. 

रत्नागिरी वडील रामजी सपकाळ लष्करात सुभेदार होते त्यांच्या आईचे नाव भिमाबाई असे होते. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आई-वडिलांचे14 वे आपत्य होते आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडे होते यावरूनच त्यांचे नाव आंबेडकर असे पडले. 

1906 मध्ये त्यांचा विवाह रमाबाई यांच्याशी झाला रमाबाई या दापोलीतील भिकू वलंगकरांच्या कन्या होत्या .1948 मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा दुसरा विवाह डॉक्टर शारदा कबीर यांच्याशी झाला तो विवाह नोंदणी पद्धतीने झाला.

डॉक्टर अभ्यास अभ्यास

आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण लष्करी स्कूलमध्ये झाली .1907 मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली अस्पृश्य जातीतील मॅट्रिक उत्तीर्ण झालेले ते पहिले विद्यार्थी होते. 

मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर बडोद्याच्या सयाजीराव महाराजांकडून दरमहा 25 रुपये शिष्यवृत्ती मिळाली .अस्पृश्य असल्यामुळे त्यांना संस्कृत शिकता आली नाही परंतु नंतर त्यांनी ती अवगत करून घेतली. 

1915 मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठातून एम ए पदवी मिळवली. ते अस्पृश्य म्हणून मिळालेल्या वाईट वागणुकीमुळे त्यांनी बडोद्याच्या संस्थानातील नोकरी सोडून ते मुंबईला आले व तेथे उदरनिर्वाहासाठी स्टॉक अँड शेअर्स मध्ये सल्ला देणारी एक कंपनी काढली. 

1916 मध्ये जेनेसिस अँड डेव्हलपमेंट या निबंधाचे वाचन केले तसेच 1916 मध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मध्ये प्रवेश घेतला. 1917 मध्ये मुंबई वर्स कॉलेज मध्ये खाजगी व्यापार शिक्षण संस्थेत त्यांनी काही काळ अर्थशास्त्र बँकिंग कायदा या विषयाचे अध्यापन केले. 

1916 मध्ये भारतीय नफ्याचा वाटा एक ऐतिहासिक वृद्धकरणात्मक परिशिलन नावाचा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला व पीएचडी ही पदवी मिळवली. 1918 ते 20 मध्ये मुंबईतील सीडने हम कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले पुढे शाहू महाराजांच्या सहकार्यातून इंग्लंडला गेले. 

1921 मध्ये एम एस सी 2 पदवी प्रदान करण्यात आली. १९२३ मध्ये बॅरिस्टर परीक्षा पास झाले जून 1952 मध्ये कोलंबिया विद्यापीठातील पदवीदान समारंभात बाबासाहेबांना भारतीय राज्यघटना बद्दल डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी प्रदान करण्यात आली. 

1953 मध्ये उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद यांच्याकडून डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी देण्यात आली. 

आंबेडकरांचे कार्य

1924 मध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना करण्यात आली. 

1927 मध्ये महाडचा सत्याग्रह केला. 

1927 मध्ये मनुस्मृतीचे दहन केले. 

अंबादेवी मंदिर सत्याग्रह केला. 

1925 मध्ये समता सैनिक दल सरकार केले. 

पर्वती मंदिर सत्याग्रह केला. 

समाज समता संघाची स्थापना केली. 

1930 मध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह केला. 

गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्य समाजाची बाजू मांडली . 

पुणे करार केला. 

1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. 

महा वतन रद्द करण्यासाठी प्रयत्न केले. 

19421942 मध्ये शेड्युल कास्ट फेडरेशन ची स्थापना केली. 

1945 मध्ये पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 

1956 मध्ये रिपब्लिकन पक्षाची स्थापना. 

1920 मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. 

1927 मध्ये बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. 

1930 मध्ये जनता पाक्षिकाची स्थापना केली. 

1935 मध्ये येवला येथे सभा सभा घेतली. 

1920 मध्ये माणगाव येथे दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाची परिषदेत घेण्यात आली. 

अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद नागपूर येथे घेतली. 

हिंदू कोड बिलावर कार्य केले. 

डॉ आंबेडकर लेखन कार्य

प्रॉब्लेम ऑफ रूपी

दअनटचेबल्स

रिडल्स ऑफ हिंदू झम

स्टेट अँड मायनॉरिटीज

शूद्र पूर्वी कोण होते

हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती

हिंदू धर्मातील कोडे

बौद्ध पूजा पाठ

थॉट्स ऑन पाकिस्तान

आंबेडकर यांचे स्त्रियांविषयी कार्य

1952 नंतर आंबेडकरांच्या प्रयत्नातून चार ऍक्ट पारित झाली
१ हिंदू मॅरेज ॲक्ट 1955
२ हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956
३. हिंदू मायनॉरिटीज अँड गार्डियन शिप ऍक्ट 1956

भारतीय राज्यघटनेचे लेखन केले व उत्तम रचना केली म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार सुद्धा म्हटले जाते. ज्यावेळेस आपण राज्यघटनेचा अभ्यास करतो. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना किती समग्र आहे व सर्वसामान्यांच्या हिताची आहे हे समजते. 
खरं सांगायचं तर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व क्षेत्रांमध्ये कार्य केले त्यांनी तयार केलेल्या घटनेमुळे आज कायदा सर्वांसाठी समान आहे. याची जाणीव होते आणि घटनेचे प्रत्येक कलम वाचताना बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची जाणीव देखील होते. 





Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा शासनाशी संबंधित वेबसाईट नाही. कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून मानू नका आणि कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संबंधित तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाहीत.आम्ही आमच्या सर्व अभ्या गताना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post