भारत हा कृषिप्रधान देश आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये होणाऱ्या वाढीबरोबरच कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. याची प्रचिती आपणाला दिवसेंदिवस येत आहे .ज्याप्रमाणे सेवा क्षेत्रामध्ये वाढ होते. उद्योग क्षेत्रामध्ये वाढ होते त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा वाढ मोठ्या प्रमाणावर होत आहे. याचे जवळचे उदाहरण म्हणजे भारताने बाजरी उत्पन्नामध्ये मिळवलेला पाचवा क्रमांक होय.
या अगोदर भरड धान्याच्या उत्पन्नात वाढ घडून आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न देखील केलेले आपल्याला आढळून येतात देशात खाद्य आणि पेय कंपन्या मोठ्या प्रमाणावर भरड धान्याचा वापर करू लागल्या आहेत. भरड धान्यापासून मोठ मोठ्या प्रमाणावर पॅकेज फूड तयार करण्यावर मोठमोठ्या कंपन्यांचा भर सद्यस्थितीत दिसून येतोय या प्रोत्साहनामुळे भरडधान्याच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येते.
2021 ते 2026 दरम्यान भरडधान्याची वाढ 4.5% होण्यासाठी केंद्र सरकारने देखील मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे 2021 ते 26 यादरम्यान भरडधान्याची वाढ 4.5% होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
सरकारने 2025 पर्यंत 820 कोटी रुपयाची भरडधान्य निर्यात करण्याचा संकल्प केला आहे.
भरड धान्य उत्पादनामध्ये जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी भारत मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे.
सेवा क्षेत्रा बरोबरच उद्योग आणि कृषी क्षेत्रावर वाढ होण्यासाठी देशपातळीवर कृषी मंत्रालय मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. धान्याच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी श्री अन्न योजना देखील सुरू करण्यात आली आहे.
जागतिक बाजरी उत्पन्नामध्ये भारताचा वाटा 40% एवढा आहे भारत सध्या टॉप पाच बाजरी उत्पादक देशांमध्ये सामील झालेला आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
