उन्हाळा आला रे! काळजी घ्या

 महाराष्ट्रामध्ये तीन ऋतू येतात त्यामध्ये पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतू येतात सद्यस्थिती फार मोठ्या प्रमाणावर हवामान बदल होते . तरी महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसाळा असतो .ऑक्टोबर ते जानेवारी हिवाळा असतो .मार्च एप्रिल मे मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उष्णता जाणवते. यावर्षी उन्हाळा थोडा उशिरा आला पण यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर उष्णता जाणवते यासाठी आपण काही प्रमाणावर खबरदारी घ्यायला हवी. 


 घ्यावयाचा आहार

       उन्हाळ्यात आहारामध्ये शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थाचा समावेश असावा .तसेच द्रव पदार्थाचा आहारामध्ये समावेश करावा. उन्हाळ्यात दिवसाची सुरुवात गुलकंद खाऊन करावी. उपाशी गुलकंद खावे गुलकंद शरीराला थंडावा प्रदान करते. 

      धने जिरे बडीशेप यांची पूड करून आपण घरी ठेवू शकता व पाण्याबरोबर घेऊ शकता .दोन-तीन वेळा पाण्याबरोबर घेतल्यामुळे शरीरात उष्णता वाढणार नाही. 

      तसेच धने ,डाळ ,बडीशोप आवळ्याचे चूर्ण याचा मिळून केलेला मुखवास जरी खाल्ला तरी त्यामुळे उष्णता मोठ्या प्रमाणावर कमी होईल. 

      उन्हाळ्यात घराबाहेर जातेवेळेस एक ग्लास पाणी निश्चित प्यावे. त्यामुळे शरीर थंड राहील व  शरीराचे तापमान देखील कमी होईल. 

      उन्हाळा म्हटलं की कोल्ड्रिंक आलच उन्हाळ्यात आपण ज्यूस थंड पेय घेतले पाहिजे त्यातून उष्णतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होईल व शरीराला आराम जाणवेल. 

      उन्हाळ्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी एक घरगुती उपाय म्हणजे घरचे ताक आपल्या घरी सहज उपलब्ध होणारे ताक आपण ग्रहण केले पाहिजे. तसेच त्यामध्ये जिऱ्याचा मसाला सुद्धा घातला पाहिजे त्यामुळे शरीराला आराम मिळेल. 

      उन्हाळ्यात शेतातील कामे सहसा सकाळीच आटपावी किंवा दुपारी शेतात जावेच लागले तर रुमाल घेऊन जावे. शक्यतो उन्हाळ्यात दुपारी आरामच करावा त्यामुळे शरीराचे तापमान वाढणार नाही. 

      अति उन्हात गेल्यामुळे चक्कर येऊ शकते किंवा जास्त प्रमाणावर ऊन लागले तर मृत्यू देखील ओढाऊ शकतो .त्यामुळे खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे अशावेळी शक्यतो रुमाल घेऊन घराबाहेर पडावे. 

 लहान ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​ मुलांबाबत घ्यावयाची काळजी

      लहान मुलं म्हटलं की काळजी घ्यावीच लागते. मुलांना खेळण्याची खूप सवय असते अशावेळी पालकांनी खबरदारी घ्यावी. मुलांना खेळते वेळेस सकाळी किंवा संध्याकाळी खेळू द्यावे व दुपारी आराम करायला लावावी .नाहीतर उन्हाळ्या मध्ये शरीराचे तापमान वाढू शकते मुलांना प्यायला थंड पेय द्यावी तशीच टरबूज पपई लिंबू शरबत आधी पदार्थ आहारात असावी. 

      उन्हाळ्यात दूध दही तूप हे सेवन करण्यात यायला हवी .त्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो व शरीराचे तापमान नियंत्रित राहते. शक्यतो उन्हाळ्यात फ्रिजचं पाणी कितीही प्यावे वाटले तरी टाळावी शक्यतो माठातील पाणी प्यावे ते आरोग्यासाठी उत्तम राहील. 

      उन्हाळ्यात आहार हलका ठेवला पाहिजे आणि जेवणामध्ये नक्की एक चमचा तूप ग्रहण केले पाहिजे .यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित होते तसेच आपण ज्वारीची भाकरी सुद्धा खाऊ शकतो. 

      उन्हाळ्यात शक्यतो आपल्या आहारामध्य रसयुक्त फळांचा आणि भाज्यांचा समावेश करावा पुदिना गाजर संत्री पपई टरबूज इत्यादी फळांचा समावेश करावा. 


Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा शासनाशी संबंधित वेबसाईट नाही. कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून मानू नका आणि कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संबंधित तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाहीत.आम्ही आमच्या सर्व अभ्या गताना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post