महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद विभागातील जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतरण करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.
नगर विकास विभागाच्या उपसंचालकांनी ही माहिती दिलेली आहे. जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतरण करताना सीमा वाढ तुर्तास करता येणार नाही.असा निर्णय घेण्यात आलेला आहे गेली दोन-तीन महिन्यापूर्वी जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती.
अहमदनगर चे नाव आता अहील्यानगर होणार ::मुख्यमंत्र्यांची घोषणा
जालना जिल्हा विषयी माहिती
जालना हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी स्थित आहे. तसेच तो मराठवाड्याच्या उत्तर दिशेस स्थित आहे यापूर्वी जालना हा जिल्हा अस्तित्वात नव्हता. त्या अगोदर तो औरंगाबाद जिल्ह्याचा एक भाग होता नंतर तो औरंगाबाद जिल्ह्यातील एक तालुका म्हणून अस्तित्वात आला.जालना हा तालुका एक मे 1981 रोजी जिल्हा म्हणून स्थापन झाला.
जालना जिल्ह्याची स्थापना करते वेळेस जालना जिल्ह्यामध्ये पाच तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला होता. 15 ऑगस्ट 1992 रोजी नवीन तीन तालुक्यांचा समावेश जालना जिल्ह्यामध्ये करण्यात आलेला होता. आता या जिल्ह्यांमध्ये आठ तालुके अस्तित्वात आहेत या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7612 चौरस किलोमीटर आहे.
या जिल्ह्यामध्ये गोदावरी दुधना यासारख्या महत्त्वपूर्ण नद्या प्रवाहित होतात ज्वारी कापूस हरभरा आणि डाळी पिके यासारखी पिके जालना जिल्ह्यामध्ये घेण्यात येतात. जालना हा मराठवाड्यातील जिल्हा आहे त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये जलसिंचनाची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवते.
जालना जिल्ह्यामध्ये कापड उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. तसेच इथे बिडी उद्योग देखील केल्या जातो संत रामदास स्वामी यांच्यासारख्या महान संतांचा जन्म देखील जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यात झालेला आहे.
दहावीचा निकाल जाहीर ...ssc reasult 2023 declare
जालना जिल्ह्यातील धार्मिक आणि पर्यटन स्थळे
जालना जिल्हा हा धार्मिक सांस्कृतिक व राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. महाराष्ट्राच्या मध्यभागी या जिल्ह्याचे स्थान असल्यामुळे या जिल्ह्याला महत्त्वाचे मानली जाते.
श्री गणपती मंदिर राजुर
मंदिर जालना जिल्ह्याच्या उत्तरेस 25 किलोमीटर स्थित आहे हे गणपतीचे एक पूर्ण पीठ म्हणून ओळखल्या जाते.
गुरु गणेश तपोधाम
धर्मातील बांधवांसाठी गुरु गणेश हे जालना शहरातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते.हे मंदिर जालना जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तपोधाम म्हणून ओळखल्या जाते.
या जिल्ह्यांमध्ये अनेक प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत .
अलीकडेच महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर परभणी पनवेल यासारख्या महानगरपालिका अस्तित्वात आलेल्या आहेत.नवीन महानगरपालिका म्हटलं की राज्यांमध्ये जिल्हास्तरीय क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास करणे, जिल्हास्तरांना शहरी स्तराकडे वळवणे सरासरी जिल्हा परिषद ही ग्रामीण भागासाठी अस्तित्वात असते.तर महानगरपालिका ही शहरी क्षेत्रासाठी अस्तित्वात असते एखाद्या नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस रूपांतरण होते त्यावेळेस त्या शहराचा विकास चांगल्या प्रकारे होतो.
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी तर सध्या राज्यातील विकास कामांकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष दिलेले आहे.त्यामुळे शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागाचा विकास देखील मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
या अगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याबाबत काही धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत.त्यामध्ये त्यांनी नागरिकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेले आहेत.
आपणा सर्वांना माहिती आहे. की, माननीय मुख्यमंत्र्यांनी या अगोदर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ज्यष्ठ नागरिकांसाठी
बस प्रवासामध्ये शंभर टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिला सबलीकरणासाठी त्यांनी महिलांना बस प्रवासामध्ये 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतलेला आहे.त्याचबरोबर त्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75000 पदभरती करण्याचा निर्णय देखील घेतला आहे.आता यापुढेही पाहणी महत्वाची राहील की जालना शहराचा विकास मुख्यमंत्री कशा रीतीने करतील.
हे सुद्धा वाचा
अजय बंगा जागतिक बँकेच्या प्रमुख पदी
Tags
News
