अजय बंगा जागतिक बँकेच्या प्रमुख पदी

 मूळ भारतीय वंशाचे व्यावसायिक अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या प्रमुख पदी बिनविरोध निवड झाली आहे. अजय बंगा हे दोन जून पासून आपला कार्यभार सांभाळणार आहेत. जागतिक बँकेचे प्रमुख पद भूषवणारे ते पहिले भारतीय अमेरिकन नागरिक आहेत. 

अजय बंगा कोण आहेत

अजय बंगा जागतिक बँकेच्या प्रमुख पदी विराजमान होणारे पहिले भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत अजय बंगा जागतिक बँकेचे क्रमवारी मध्ये 14 वे अध्यक्ष असणार आहेत ते डेव्हिड मल्पस यांची जागा घेणार आहेत

अजय बंगा यांचा जन्म पुणे महाराष्ट्र भारत येथे झालेला आहे त्यांनी त्यांची शिक्षण आयआयएम अहमदाबाद इथून पूर्ण केले त्यांनी अहमदाबाद येथे एमबीए केलेले आहे

त्यांनी या अगोदर नेसले इंडिया सिटी बँक पेपसी को मास्टर कार्ड सोबत काम केलेले आहे बिजनेस राऊंड टेबल आईसीसी यु एस इंडिया सीईओ फोरम मध्ये देखील काम केलेली आहे

अजय बंगा हे जागतिक बँकेच्या प्रमुख पदी निवड होण्याअगोदर व्हाईस चेअरमन जनरल अटलांटिक येथे कार्यरत होते

अजय बंगा यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार देखील प्राप्त आहे त्यांना भारत सरकारने 2016 मध्ये पद्मश्री हा पुरस्कार प्रदान केलेला आहे

अजय बंगा यांची निवड पाच वर्षासाठी जागतिक बँकेच्या प्रमुख पदी करण्यात आलेली आहे अजय बंग आहे आपले पद दोन जून 2023 पासून ग्रहण करणार आहेत

त्यांच्या नावाची शिफारस अमेरिकन प्रेसिडेंट जो बायडन यांनी केलेली होती जागतिक बँकेच्या प्रमुख पदी दावा करणारे अजय बंगा हे एकमेव व्यक्ती होती तसेच ते जनरल आटलांटिक मध्ये देखील उपाध्यक्षपदी काम करणारी व्यक्ती होते

वर्ल्ड बँकेच्या 25 सदस्यांपैकी 24 सदस्यांनी बंगा यांना मतदान केलेले आहे त्यामध्ये रशिया अनुपस्थित राहिला

वित्त आणि विकास विशेषतज्ञ अजय बंगा यांना जलवायू परिवर्तन आणि इतर वैश्विक संकटांचा सामना करण्यासाठी जागतिक बँकेच्या प्रमुख पदी नियुक्त करण्यात आले

विश्व बँक समूहाचा अध्यक्ष पुनर निर्माण आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय बँक चा कार्यकारी निर्देशक बोर्डाचा अध्यक्ष देखील असतो

2012 मध्ये अजय बंगा यांना फॉरेन पॉलिसी असोसिएशन मेडल देऊन सन्मानित करण्यात आलेले होते 

2019 मध्ये त्यांना एलीस आइसलँड मेडल ऑफ ओनर आणि बिझनेस कौन्सिल ऑफ इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग ग्लोबल लीडरशिप पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले होते

2021 मध्ये त्यांना सिंगापूर पब्लिक सर्विस स्टार चा विशिष्ट मित्र म्हणून सन्मानित करण्यात आलेले होते




हे सुद्धा वाचा

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा शासनाशी संबंधित वेबसाईट नाही. कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून मानू नका आणि कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संबंधित तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाहीत.आम्ही आमच्या सर्व अभ्या गताना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post