कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय

 कर्नाटक विधानसभा निवडणूक


2023 मध्ये काँग्रेसला दणदणीत विजय मिळालेला आहे .असे म्हटले जाते की कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 ची रणनीती काँग्रेस पक्षातर्फे सुनील कानू गोलू यांनी आखलेली होती. 

कर्नाटक विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणावर यश मिळण्याचे कारण काय हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 मध्ये काँग्रेस पक्षाने मोठ्या प्रमाणावर रणनीती आखलेली होती. त्यांनी तळागाळातील मतदार संघाचे सर्वेक्षण देखील केलेले होते. तसेच काँग्रेस पक्ष कुठल्या भागामध्ये प्रभावी आहे तसेच कुठल्या भागामध्ये पक्ष कमी प्रमाणावर प्रभावी आहे .याची शहानिशा देखील काँग्रेस पक्षाने केलेली होती त्यानंतर कार्याची दिशा काँग्रेस काँग्रेस पक्षाने ठरवलेली होते. 

भारत जोडो यात्रा ही जवळपास 48 मतदार संघामधून गेलेली होती. तसेच या यात्रेने 511 किलोमीटर अंतर पूर्ण केलेले होते .आणि 21 दिवसांच्या मोठ्या प्रवासाबरोबरच कर्नाटक राज्यातील यात्रा संपवली होती. या दरम्यान राहुल गांधी यांनी ज्या 48 मतदार संघामधून प्रवास केलेला होता त्या 48 मतदार संघामध्ये काँग्रेसचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणावर दिसून आला आहे. 

2018  च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 104 जागा मिळालेल्या होत्या. तर 2023 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला केवळ 66 जागेवर समाधान मानावे लागले. यावर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाने मात्र मोठ्या प्रमाणावर बाजी मारल्याचे दिसून येते.

हे सुद्धा    जालना ठरली महाराष्ट्रातील नवीन महानगरपालिका

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा शासनाशी संबंधित वेबसाईट नाही. कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून मानू नका आणि कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संबंधित तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाहीत.आम्ही आमच्या सर्व अभ्या गताना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post