दोन हजार रुपयांची नोट बंद होणार का

सध्या दोन हजार रुपयांची नोट बंद होणार का असा सर्वसामान्यांना पडणारा एक प्रश्न आहे आपणा सर्वांना माहित आहे की शुक्रवारी आरबीआयने दोन हजार रुपयांची नोट चलनातून कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे या अगोदर 2016साली आरबीआय ने पाचशे व हजार रुपयांची नोट बंद केली होती
यानंतर पडणारा प्रश्न म्हणजे दोन हजार रुपयांची नोट चलनातून कमी करण्याचा निर्णय आरबीआयने का घेतला असावा 
कारण ज्यावेळेस 2016साली आरबीआय ने नोटबंदी करण्याचा निर्णय घेतला होत चलनातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा वगळल्या होत्या त्यामुळे चलनाचा मोठ्या प्रमाणावर प्रश्न निर्माण झालेला होता तेव्हा आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून चलनाची कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला आता इतर चलनी नोटा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्यानंतर दोन हजार रुपयांची नोट चलनातून कमी करण्याचा निर्णय आरबीआय ने घेतलेला आहे
आरबीआयने यावेळेस दोन हजार रुपयांची नोट चलनातून कमी करते वेळेस खबरदारी देखील मोठ्या प्रमाणावर घेतलेली आहे आरबीआयने यावेळेस दोन हजार रुपयांची नोट चलनातून कमी करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी निश्चित केलेला आहे त्यामुळे सर्वसामान्यांना आता दोन हजार रुपयांची नोट 30 सप्टेंबर पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे 23 मे पासून 2000 रुपयांची नोट बदलून घेण्याची परवानगी आरबीआयने दिलेली आहे. 
यावेळेस आरबीआय ने दिव्यांग व अपंगांसाठी विशेष सुविधा देण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे त्यानुसार दिव्यांग व अपंगांना कुठलाही त्रास न होता नोटा बदलून घेण्यात मदत होईल याची खबरदारी आरबीआय यावेळेस घेणार आहे
आरबीआयने नोट्स बदलण्यासाठी 19 विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून नोट बदलून घेणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास हा कमी प्रमाणात होणार आहे या अगोदर आपणा सर्वांना माहित आहे 2016 यावर्षी झालेल्या नोटबंदीमुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता त्यामध्ये काही जणांचा बळी देखील गेलेला होता पण यावेळेस आरबीआय ने मोठ्या प्रमाणावर दक्षता घेतलेली आहे त्यामुळे नोटा बदलताना होणारा त्रास कमी कसा होईल याकडे आरबीआयने लक्ष दिलेले आहे यावेळेस नोटा देखील बदलवून घेण्यासाठी सोयीस्कर ठरणार आहे नोट बदलून घेण्यासाठी कुठलाही शुल्क आकारला जाणार नाही. 


हे सुद्धा पहा





Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा शासनाशी संबंधित वेबसाईट नाही. कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून मानू नका आणि कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संबंधित तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाहीत.आम्ही आमच्या सर्व अभ्या गताना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post