आता शेतीच्या नुकसानीचे होणारे इ पंचनामे

 बदलत्या काळा बरोबरच हवामानात देखील बदल मोठ्या प्रमाणावर होत आहे यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बदलत्या हवामानाचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतीमध्ये येणारे पीक व शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते. 

बदलत्या हवामानाबरोबरच बदलता पाऊस काळ बदलते पावसाचे प्रमाण याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत असतो कधी अवकाळी पाऊस पडतो. तर कधी गारा पडतात कधी पाऊस जास्त प्रमाणावर होतो तर कधी पाऊस कमी प्रमाणावर होतो.पण,हल्ली पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याचबरोबर पावसाची अनियमितता देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे. पावसाळ्यामध्ये शेतीमधील कापूस सोयाबीन मुग उडीद यासारख्या पिकांना जास्त पावसाचा फटका बसतो. तसेच,हिवाळ्यामध्ये पण हिवाळी ज्वारी बाजरी मका गहू हरभरा इत्यादी पिकांना मोठ्या प्रमाणावर जास्त पावसाचा फटका बसतो. 

E pik pahani
यावर्षी तर पावसाने अगदी हद्दच केली भर उन्हाळ्यात देखील पाऊस पडतोय त्यामुळे शेतकऱ्यांची काढणीला आलेली पिके नुकसानीच्या सावताखाली आली आहेत. 

येत्या जून पासून आता संगणकीय प्रणालीचा वापर करून ई पंचनामे करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे .कारण वाढती लोकसंख्या व त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची उपलब्धता कमी यामुळे प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे .मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बोलते वेळेस हे पण सांगितले की ई पंचनामे हे पारदर्शरित्या केले जातील त्यामध्ये कुठलाही मानवी हस्तक्षेप असणार नाही. 

यावर्षी तर अवकाळी पावसाने हद्दच केली अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या घशाशी आलेला घास देखील निसर्गाने काढून घेतला. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळणे अगदी गरजेचे आहे .कासव गतीने होणाऱ्या पंचनामे मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व नुकसानीची अचूक आकडेवारी सुद्धा मिळत नाही .यावर उपाय म्हणजे जूनमध्ये ड्रोन व उपग्रहाच्या माध्यमातून ई पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे बोलते वेळेस हे देखील सांगितले की ड्रोन द्वारे ई पंचनामे हे वेळेत होतील. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत वेळेत पोहोचेल यावर्षी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदला हा एच डी आर एफ व एन डी आर एफ पेक्षा जास्त देण्याचे ठरवले होते .तसेच हेक्टरी मर्यादा देखील वाढवण्यात आली होती त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. 

नुकसानग्रस्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्या च्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभा राहणे महत्त्वाचे आहे.होणारी गारपीट पडणारा दुष्काळ तसेच अवकाळी पावसाचे थैमान यामध्ये सरकारने नेहमीच शेतकऱ्याच्या पाठीशी असणे महत्त्वाचे आहे. 

ई पंचनाम्यासंदर्भात बैठक सह्याद्री अतिथी ग्रहावर झाली.त्यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सचिव आयुक्त तसेच जिल्हा अधिकाऱ्यांना देखील यामध्ये सामावून घेण्यात आले होते. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. 

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा शासनाशी संबंधित वेबसाईट नाही. कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून मानू नका आणि कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संबंधित तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाहीत.आम्ही आमच्या सर्व अभ्या गताना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post