अबब! राज्यात ज्वारी बाजरी च्या किमती कडाडल्या


राज्यात यंदा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या ज्वारीच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी दरवर्षीपेक्षा ज्वारीची लागवड ही कमी प्रमाणात करण्यात आलेली आहे दरवर्षी ज्वारीच्या उत्पादनामध्ये भरमसाठ वाढवायची पण यावर्षी फक्त 36 हजार हेक्टरवर ज्वारीचे उत्पादन घेण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणारी ज्वारी आता महागणार आहे यावर्षी शेतकऱ्यांनी देखील उपलब्ध जलसिंचनाच्या आधारे शेतीची पीक  पद्धती बदलली शेतकऱ्यांनी यावर्षी नगदी पिके व भाजीपाल्या पीक याकडे जास्त लक्ष दिलेले आहे.त्यामुळे ज्वारीच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर कमतरता आली त्यामुळे ज्वारीच्या किमती देखील मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. शेतीशास्त्रातील अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे जेव्हा उत्पन्न कमी होते तेव्हा किमती देखील वाढतात त्यामुळे सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारी बाजरी ज्वारी आता मोठ्या प्रमाणावर महागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी ज्वारीचे उत्पन्न घेतल्यानंतर जनावरांसाठी उपलब्ध होणारा चारा देखील कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्वारीच्या किमती किती पर्यंत वाढतात हे पाहणे महत्त्वाचे राहील. 



Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा शासनाशी संबंधित वेबसाईट नाही. कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून मानू नका आणि कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संबंधित तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाहीत.आम्ही आमच्या सर्व अभ्या गताना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post