चीनला मागे टाकून भारत लोकसंख्येच्या दृष्टीने जगात पहिल्या क्रमांकावर

 142.86 कोटी लोकसंख्येसह भारत जगातील सर्वात मोठा लोकसंख्येचा देश ठरला आहे .युनायटेड नेशन चा स्टेट पोपुलेशन रिपोर्ट म्हणजे एस ए डब्ल्यू पी ने ही आकडे प्रसिद्ध केले आहेत. या रिपोर्ट मध्ये भारताने चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे ठेवले आहे. म्हणजे आपण आता लोकसंख्येच्या बाबतीत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आलो आहेत. 

The world papulation is at 8 billion या शीर्षकाखाली युएनची वर्ल्ड पापुलेशन रिपोर्ट 2023 प्रसिद्ध करण्यात आली. या रिपोर्ट मधून लोकसंख्येच्या बाबतीत भारताने आता चीनला मागे टाकले आहे .या रिपोर्टनुसार चीनची लोकसंख्या142. 57 कुठे आहे यूएन चा रिपोर्ट मधून भारताची लोकसंख्या गेल्या एक वर्षात1.56% वाढली आहे. 



भारतात एकूण लोकसंख्येच्या 68 टक्के लोकसंख्या ही 15 ते 64 वयोगटातील आहेत .असे या रिपोर्ट मधून सांगण्यात आली .भारतात फर्टिलिटी रेट हा दोन आहे. लोकसंख्येचे सरासरी आयुर्मान हे 71 वर्ष आहे. अशी या रिपोर्ट मधून सांगण्यात आली आणि महिलांसाठी सरासरी आयुर्मान हे 74 वर्ष आहे असे या रिपोर्ट मधून दर्शवण्यात आली. 

भारतामधील लोकसंख्या वाढीबरोबरच तरुण लोकसंख्येचा स्त्रोत देखील मोठ्या प्रमाणावर आहे. असे यूएन चे सांगणे आहे त्यानुसार भारत 140 कोटी संभावनावर काम करू शकतो त्याचबरोबर भारत एक शक्तिशाली देश आहे .आणि शिक्षण आरोग्य टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर काम करत असल्याचे देखील या रिपोर्ट मधून सांगण्यात आली भारतात 65 वर्षावरील लोकसंख्या ही 7% आहे अशी युएन चा रिपोर्ट मधून सांगण्यात आली. 

लोकसंख्येमधून होणारा फायदा

आतापर्यंत जेवढे पण देश विकसित झालेले आहेत .ते तरुण लोकसंख्येच्या बळावर झालेले आहेत .भारताकडे मोठ्या प्रमाणावर तरुण लोकसंख्या आहे त्यामुळे भारतासाठी ही युवा लोकसंख्या आता शक्तीपुंज म्हणून काम करू शकते .जगदेखील आता ही सांगते की जगातील जे विकसित देश मोठ्या प्रमाणावर प्रगती करू शकले ते तरुण लोकसंख्येच्या बळावरच. 
विकसित देशांच्या सूची मधील अमेरिका, ब्रिटन जर्मनी यासारखे देश देखील प्रगती करू शकले ते तरुण लोकसंख्येच्या बळावरच. 
भारत या तरुण लोकसंख्येच्या बळावरच आता जगातील सर्वात मोठा सर्विस प्रोव्हायडर देश सुद्धा होऊ शकतो .कारण आमच्याकडे शक्ती आहे लोक आहेत काम करण्याची तरुणांकडे कुवत देखील आहे. 
पुढे चालून भारत मॅन्युफॅक्चरिंग हाफ सुद्धा बनू शकतो कारण भारताकडे मोठ्या प्रमाणावर लेबर फोर्स उपलब्ध होणार आहे. 
भारताचे क्षेत्रफळ जगामध्ये जवळपास अडीच टक्के आहे पण लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. 

वाढत्या लोकसंख्ये पासून होणारा तोटा

ज्यावेळेस एखाद्या देशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यावेळेस उपलब्ध होणाऱ्या संसाधनावर देखील ताण पडतो .तसेच मूलभूत गरजा भागवण्यावर सुद्धा अडचणी येतात भारतामध्ये जगाच्या अडीच टक्के क्षेत्रफळामध्ये एकूण जगाच्या 18 टक्के लोकसंख्या सामावते वाढत्या लोकसंख्येमुळे प्रत्येक गोष्टीसाठी लढाई होऊ शकते .कारण उपलब्ध होणारी लोकसंख्या या प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या साधनांमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत जाणवते. 

सध्या च्या जगामध्ये बेरोजगारी हा मोठ्या प्रमाणावर प्रश्न आहे. सध्या जगामधील बहुदा देश हे बेरोजगारीने त्रस्त आहेत त्याचबरोबर येणारी नैसर्गिक संकटे ही देखील देशांसाठी मोठी आहेत एकीकडे बेरोजगारीच्या प्रश्नाशी सरकार लढत असतानाच मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढ ही समस्याच मानायला हवी. 

सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांची क्रमवारी

1.भारत
2. चीन
3. अमेरिका
4. इंडोनेशिया
5. ब्राझील

वाढत्या लोकसंख्येमुळे आता यापुढे भारत आणि चीन यांची लोकसंख्या जगाच्या 33% असणार आहे .सध्या तीस लाख लोकसंख्या ही भारताची चीन पेक्षा जास्त आहे बेरोजगारीचं मोठं कारण देखील लोकसंख्या वाढ ही आहे. काही देश याला गंभीर घेतात आता भारत यावर काय विचार करते हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. या वर्षा अगोदरच ग्लोबल एक्सपर्टने अंदाज व्यक्त केला होता की 2023 मध्ये भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल आणि आता संयुक्त राष्ट्र संघटनेच्या फुलेशन रिपोर्टनुसार भारताने चीनला मागे टाकून जगामध्ये पहिले स्थान ग्रहण केलेले आहे . 
संयुक्त राष्ट्र महा संघटनेची स्थापना 1944 नंतर द्वितीय महा युद्ध संपल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्येच्या आकडेवारी मध्ये 1950 नंतर भारताची लोकसंख्या ही पहिल्यांदाच चीनच्या लोकसंख्येपेक्षा जास्त असल्याचे नोंदविण्यात आले .संयुक्त राष्ट्राची स्थापना 1945 मध्ये झाली. यानंतर 1950 पासून संयुक्त राष्ट्र संघटनेने लोकसंख्येची आकडेवारी प्रसिद्ध करण्याचे ठरवले व केली देखील रिपोर्ट मध्ये ही देखील सांगण्यात आली की ,झिरो ते 14 वयोगटातील 25% लोकसंख्या भारतात आहे. 10 ते 19 वयोगटातील 18% लोकसंख्या आहे .दहा ते 24 वयोगटातील लोकसंख्या 26 टक्के आहे .या लोकसंख्येमध्ये जर आपण पाहिले तर जगातील प्रत्येक पाचवा व्यक्ती हा भारतीय ठरतो. 

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा शासनाशी संबंधित वेबसाईट नाही. कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून मानू नका आणि कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संबंधित तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाहीत.आम्ही आमच्या सर्व अभ्या गताना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post